नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकरसंक्रातीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा तसेच हे नवीन वर्ष भंडारी मंडळ परिवाराला सुख आणि समृद्धीचे जावो.!!

* दुसरे स्नेहसंमेलन: नवे सामाजिक पर्व

             पहिल्या स्नेहसंमेलनानंतर आपल्या मंडळींच्या नात्यातील दाटी वाढलेली होती. आणि आमची पावले आपल्या सामाजिक कार्याकडे वळत होती. पण आमची ही कल्पना आपल्या इतर मंडळींपर्यंत पोहोचवणे म्हणजे आमच्यासाठी आव्हानच होते. शिवाय पहिल्या स्नेहसंमेलनानंतर पुढल्या कार्यक्रमाची उत्सुकता सर्वांच्याच मनात होती. म्हणूनच आम्ही आपल्या दुसरया स्नेहसंमेलनाची आखणी करण्यास सुरुवात केली आणि सोबतच त्या पुढील नवा सामाजिक उपक्रम- रक्तदान शिबिराचा बेत सर्वांसमोर मांडला आणि आपल्या मंडळाचे पहिले सामाजिक पर्व सुरु झाले.
                 खरे सांगायचे तर कार्यक्रमाला भेट देण्यापेक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात जी मजा असते ती काही औरच असते. आणि आम्ही सर्व या आयोजनाच्या तयारीत खूप खुश होतो. आणि सर्वांची डोकी वेगवेगळ्या कल्पनांना जन्म देत होती. काही तरी नवे करूया असा हुरूप सर्वांनाच होता. कट्ट्यावर होणाऱ्या मिटिंगमध्ये एक एक जण आपापली जबाबदारी घेत होते. आणि उत्साहाने ती पारही पाडत होते. पहिल्या स्नेहसंमेलनाच्या अनुभवामुळे कोणकोणते प्रश्न समोर उभे राहू शकतात याचे भान ठेऊन एक एक मजल चढू लागलो. आणि अखेर तो दिवस उजाडला.



 दिनांक : १ जून २००८,
स्थळ : काशिनाथ धुरू हॉल, दादर पश्चिम
वेळ : सायं. ५ ते ९.३०






                आम्ही खूपच उत्साही होतो. हळू हळू सर्व मंडळी सभागृहात येऊ लागली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम सतीश राजीवडेकर यांनी आपल्या कार्यक्रमाची ओळख सर्वांना करून दिली. पुढील कार्यक्रमाची सूत्रे निमिष तांडेल आणि श्वेता तोडणकर यांनी हाती घेतली. आपल्या सर्व मंडळींना भंडारी समाजाची थोडी फार माहिती मिळवून देणे हे खरे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम सुरु झाला. 



                   "जात" हया कल्पनेकडे लोकांनी फक्त नकारार्थक दृष्टीने पहिले असून त्या कल्पनेला ग्रहण लावले आहे. परंतु याची सकारात्मक बाजू लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करून समाजाकडे काहीतरी मागण्यापेक्षा काही तरी देताही येऊ शकते हे आपल्या मंडळींनी साध्य करून दाखविले. आणि आपल्या पहिल्या सामाजिक कार्याची रक्तदान शिबिराची तारीख घोषित करण्यात आली. थिंक फाउंडेशनचे सचिव श्री. हरप्रीत यांनी रक्तदान शिबीर कसे करतात? त्यासाठी कोण- कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? तसेच सर्वांच्या मनातील प्रश्नांचे समाधान पूर्वक उत्तरे दिली. 

                      सुरुवात झाली.... गेम्स, डान्स आणि मजेची.... पार्टनर पार्टनर, ऑन द स्पोट स्टेज शो, रेंम्प वौक सारखे भरपूर खेळ आम्ही खेळलो. आणि डि.जे.च्या थरारक संगीतावर आमच्या पायांनी थापा दिल्या.... सायं. ९ वाजता जेवणाची घंटा वाजली पण तरीही थांबण्याची इच्छा मात्र कोणाचीच नव्हती.


                  पण या वेळेला रोखणार कोण??? तिच्या बंधनात आम्ही सर्वच अडकलो. आणि कार्यक्रमाची सांगता केली....

आणि एकमेकांचा निरोप घेतला.

* पहिले स्नेह-संमेलन

* ३रें स्नेह संमेलन

1 टिप्पणी: