दिनांक: १४ मार्च २०१०,
ठिकाण: वर्तक सभागृह,दादर.
गेले तीन महिने आम्ही या तिसरया स्नेहसंमेलनाच्या तयारीला लागलो होतो.... संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रत्येक सदस्यांनी कळत-नकळत हातभार लावला त्या सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच. आणि आम्हा सर्वांवर विश्वास दाखवून या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहिलेल्या १०५ सदस्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
कार्यक्रमाच्या आखणीसाठी सर्वात पाहिली मिटिंग डिसेंबर मध्ये झालेली. त्यानंतर जसा प्रत्येकाला वेळ मिळत गेला तसे दर रविवारी आम्ही कट्यावर उपस्थित राहत गेलो.. खरच.... मजा म्हणजे काय असते ते आम्हाला आता कळू लागलेय..... मनात कोणतीही आड न ठेवता एकत्र येऊन जो क्षण आपण अनुभवतो ती मजा..... आणि आम्ही सर्व ही अशीच मजा अनुभवत आलोय..... फक्त निमित्त होते भंडारी मंडळाचे स्नेहसंम्मेलन आयोजित करणे....
आणि कळलेच नाही कधी उगवली शुक्राची चांदणी (स्नेहसंमेलनाला उपस्थित मंडळींना कळलेच असेल ना.. मी शुक्राची चांदणी का म्हटलेय????) तर अखेर ती १४ मार्च १० ची संध्याकाळ उगवली.......
हळू हळू मंडळी जमू लागली.....
सभागृहाच्या बाहेरच स्वागताची तयारी चालू होती....... जणू काही नवीन वर्षाचे स्वागत आपण दोन दिवस आधीच करत होतो......
सभागृहाच्या दारात रांगोळी काढणाऱ्याची लगबग चालू होती......
प्रवेश द्वारातून सभागृहात पाऊल टाकले आणि थक्क करणारा तो प्रशस्थ स्टेज आणि बाजूला वेगवेगळे रंग दाखवणारे प्रकाशझोत.....
आतापर्यंत ओर्कुटवर फोटोमध्ये पाहिलेले मित्र मैत्रीण आपण शोधू लागलो. आणि थोड्याच वेळाने सुरु झाला आपला कार्यक्रम....कार्यक्रमाची सूत्रे स्वप्नील पाटील आणि प्रणेता भाटकर यांनी हातात घेतली....श्री गणेशाच्या आराधनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यानंतर परंपरेप्रमाणे आपण दिप-प्रज्वालानाला सुरुवात करून नटराजाला वंदन केले..... भंडारी मंडळ आणि मंडळाने आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती देणाऱ्या ब्लॉगची रीतसर घोषणा कार्यक्रमात करण्यात आली. आपल्या भंडारयानमध्ये खास करून मालवणात कार्यक्रमाच्या सुरवातीस गार्हाणे घालण्याची परंपरा आहे. त्या परंपरेचा मान राखत सतीश राजीवडेकर याने गार्हाणे घालून होय महाराजा म्हणत कार्यक्रमाला सुरुवात झाली.दुर्वेश खोत आणि मुग्धा नाईक यांनी खेळ मांडला हया कार्यक्रमाच्या नांदीने सुरुवात केली.....कलाकारांच्या जीवनात येणाऱ्या उतार चढावाचा अंदाज घेत देवाजवळ साकडे घालत त्यांनी आमची मागणी देवापर्यंत पोहोचविली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीत सर्वस्वी मानली गेलीय ती म्हणजे लावणी. तिच्या शिवाय आपल्या कला विश्वात पर्याय आहे का??? मग आपण कसे विसरू शकतो तिला???? म्हणून आम्ही पण ठरवलेले कि होऊन जाऊ दे असाच लावणीचा तडका.... मग रुणालीची बाराची गाडी आली.... आणि सर्वांना घायाळ करून गेली.....
स्वप्नीलला लावणी पाहून गावच्या जत्रांचे वेध लागलेले..... आणि तो थेट पोहोचलेला कोंकणात.... तो निसर्ग, ते मोहक रूप, तो सुगंध त्याला स्वर्गातल्या अप्सारेसारखा वाटू लागत असतानाच आपल्या कार्यक्रमाला ही अवतरली अप्सराच., श्वेता तोडणकरच्या रुपात...... दोन्ही लावण्या कडक झाल्या आणि आय.पी.एल. मध्ये सचिनने सिक्स मारून अपील करावा तसा वन्स मोर च्या रूपाने प्रेक्षकांनी अपील केला..... त्या अप्सरेला पाहून दुर्वेश पुन्हा आला एक नवे गाणे घेऊन. रूप तेरा मस्ताना...... स्वप्नील आणि प्रणेताने आपल्या सर्व मंडळींना आठवण करून दिली.... भंडारी मंडळाच्या स्थापनेची आणि इतर कार्यक्रमाची.
त्यानंतर अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी स्वताहून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. 'भंडारी समाजाने एकत्र येण्याचे त्यांचे स्वप्न असून आपण असे एकत्र येऊन ते साकार झाल्यासारखे वाटते आहे' या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यानंतर सागर पाटील लिखित आणि दिग्दर्शित "मिस्टर वालावलकर " हें नाटक सादर करण्यात आले. नाटकातील पात्रे -मिस्टर वालावलकर होते निमिष तांडेल. हो तेच ते पप्पा जे संसाराला कंटाळलेले. मम्मी वालावलकरच्या भूमिकेत होती रुणाली शिरधनकर..... ओवन मिळाल्यावर काय खुश होती ना??? मागण्यांवर मागण्या करत पप्पांना हैराण केलेल्या मुलांपैकी एक मुलगा अतुल वालावलकरच्या भूमिकेत होता अतुल बागायतकर, प्रसन्ना वालावलकरच्या भूमिकेत प्रसन्ना भाटकर.... तर सचिन वालावलकरच्या भूमिकेत होता सचिन चाफेरकर..... स्वप्नसुंदरी होती स्मिता चाफेरकर तर जीनच्या भूमिकेत होता सतीश राजीवडेकर... बी एम.......... बी एम............ बी एम.. .................छुआणि पुन्हा होऊन गेली दुर्वेश आणि मुग्धाची गाणी...... ज्यांना नृत्याची साठ दिली निमिष आणि सचिन ने.....अतुल बागायतकर आणि सचिन चाफेरकर यांनी भंडारी मंडळाने आयोजीत केलेली लोगो आणि स्लोगन स्पर्धेचे निकाल या कार्यक्रमात जाहीर केले. लोगो स्पर्धेत पंकज कांबळी ह्याला प्रथम तर अभिषेक गोडकर ह्याला द्वितीय पुरस्कार घोषित करण्यात आला.
स्लोगन स्पर्धेत अश्विनी पारकर हिने बाजी मारली. तिचे “अशक्य नाही काही जर असेल एकजूट आपल्या ठायी” ह्या स्लोगनला पुरस्कार जाहीर करण्यात आला.आणि मग सुरु झाला डि जे. काही तांत्रिक कारणाने थोडा वेळ डि जे बंद झाला असला तरी आपली मंडळी स्वतः च गाणी म्हणत नाचत होती.... थोडे फार खेळ खेळत होते..... पण थोड्याच वेळात पुन्हा डीजे ने ताल धरली.... आणि सर्वांनी ताल धरली.....
आणि मग.......... सर्वात शेवटी मंडळी सज्ज झाली छायाचित्रासाठी..... मिळेल ती जागा शोधत त्या सभागृहाच्या मंचावर आम्ही स्वतःला सामावून घेतले आणि मिळाली कोडाक मुमेंट....
उपहाराचा आस्वाद घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.....
* पहिले स्नेह-संमेलन
* दुसरे स्नेहसंमेलन: नवे सामाजिक पर्व










प्रणेता आणि स्वप्नीलचं सूत्रसंचालन मस्तच होतं .............. रुणालीचं “बाराची गाडी” जेव्हा मध्येच थांबलं त्यावेळी प्रणेताने ज्या प्रकारे स्वत: एक गाणे गाऊन स्टेज सांभाळला ते खरचं खूप आवडले ............ श्वेताचा “अप्सरा आली” तर अप्रतिम होता ............. दुर्वेशचे “रूप तेरा मस्ताना” आणि “बदन पे सितारे” ही दोन गाणी आवडली ........... नाटक लय भारी होते मित्रांनो ....... रुणाली, निमिष, सतीश, सचिन, अतुल, प्रसन्ना, स्मिता सगळ्यांचीच अक्टिंग एकदम जबरदस्त होती ........... सागरने अगदी हिऱ्यांना पैलू पाडायचे काम केले होते ........ डीजे सुरु झाला तेव्हा तर आणखीनच मजा आली ......... जेवण पण माझ्या आवडीचेच होते (खास करून गुलाबजामून, कटलेट आणि लोणचं काय स्वादिष्ट होतं ......... चव अजून आठवतेय) ........... त्यामुळे एकदम मस्त मस्त मस्त गेली स्नेह संमेलनाची संध्याकाळ ........ :)
उत्तर द्याहटवा