सर्वांचे प्रयत्न चालु झाले...... मग विचार आला की आजच्या स्पर्धेच्या युगापासून आणि दूर्देवाने समाजा पासून लांब झालेली मुले ह्यांच्यासाठी आम्हाला काही करता आले तर ह्यासारखी सुंदर आणि भाग्याची कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येक मेम्बर ने खूप छान प्रतिसाद दिला. थोड्याच कालावधीत "आनंदी शाळा" , विलेपार्ले इथे वसलेल्या शाळेची निवड करण्यात आली आणि मग ०२ ऑक्टोबर २००९ ह्या दिवशी एक लहानश्या प्रमाणात एक छोटा कार्यक्रम आयोजित केला गेला.
आता शाळा म्हटली कि इस्त्री केलेला गणवेश, बेंच वरती मित्र मैत्रिणीसोबत केलेल्या गुज गोष्टी , डब्यातले वाटून खाणे, सहल , ते लहानपणीचे खेळ, अशा असंख्य आठवणी, मस्ती, मज्जा , धम्माल ह्या शब्दांच्या पलीकडले म्हणजे शाळा.. आता लगेच तुमच्या समोर तुमच्या शाळेतले दृश्य समोर आले असेल. पण ...... आनंदी शाळा याहून वेगळी होती. अशी शाळा जिथे पुस्तकी स्पर्धा नाही, अस्तित्वाच्या लढाईत वर्तमानाचा अंत नाही , स्वतःला मोठे करण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचणे नाही. ....असो.....
कार्यक्रम सुरु झाला. प्रत्येक मुलाची ओळख झाली, जसा जसा वेळ सरत गेला तशी ती मुले आमच्या मधे मिसळायला लागली. प्रत्येकाची एक वेगळी खासियत होती. हेमंत, चिन्मयी, सानिका, अदिती , श्रेया, मुज्जाम्मील , अंकित, केतकी , वैष्णवी ,संजय, पिर्थ, श्लोक, यश, इथन, कार्तिक, मुस्कान ह्यासोबत नंतर कसा वेळ गेला कळलेच नाही . गोल गोल राणी, अटक मटक चवली चटक, आई मीना सुपर सीना ह्यासारखे बाल गेम खेळताना आमच्यातला प्रत्येक जन त्यांच्यासोबत लहान झाला होता, अगदी आम्ही आमचे बालपण त्यांच्या सोबत काही क्षणाकरता पुन्हा एकदा जगून आलो.
आजच्या लेटेस्ट गाण्याच्या ठुमक्यासोबत, केकची लज्जत , फोटोंचा वर्षाव ह्या सगळ्यांची साथ घेवून त्या सुंदर , निरागस , थोडीफार खोडकर मुलांसोबत आनंदाने साजरा केला. खरच ! त्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यातील काही मुलांनी रंगवलेल्या पणत्या त्यांच्या इतक्याच जास्त सुंदर आणि त्यांनी काढलेली चित्रे , रंगांचा बरोबर उपयोग , त्यातील स्वच्छता , खरच प्रशंसनीय होती. त्यांनी एक छोटीशी आठवण म्हणून आमच्यातील काही जणांनी आणि त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी काही पणत्या विकत घेतल्या.
कार्यक्रमाची सांगता करताना आमच्याकडून त्यांनी काही भेट म्हणून थोड्या प्रमाणात वह्या , पुस्तके आणि देणगीच्या स्वरूपात काही मुलांची फीज भरण्यात आली. आम्ही त्यांचा निरोप घेतला . पण जाताना वरती उल्लेखलेल्या प्रत्येक मुलाने आमच्या मनात एक ठसा उमटवला....."जगात काहीही अशक्य नसते....अडचणींना मात करून दुसर्र्याना आनंद देता देता एक सुंदर असे जीवन जगता येते....."
एक वेगळाच अनुभव होता हा माझ्यासाठी ................... त्या लहान मुलांकडून मी खूप काही शिकली ........... त्यांच्यासोबत गप्पा मारताना, नाचताना खूप मजा आली ............ आनंदी शाळा, तेथील शिक्षक आणि ती मुले सगळ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे ......... त्या गोड मुलांना पाहून वाटले की ह्यांच्यात एवढी जिद्द आहे जगण्याची आणि आपण तर हाती पायी धड आहोत तरीही सतत शुल्लक गोष्टींवरून दु:खी होतो आणि देवाला दोष देत राहतो ...... त्यापेक्षा देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानून जीवन आनंदात घालवायचे ............... आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृशिकोन मला त्यादिवशी मिळाला त्याबद्दल मी त्या मुलांची खूप खूप आभारी आहे .......... :)
उत्तर द्याहटवागर्दित सगळ्या समंजस माणसांच्या ,
उत्तर द्याहटवाहरवली आहेत ती थोडी..
भेटून त्यांना आम्हाला लागली
त्यांची अविट गोडी ....
मन त्यांचे साफ ,सुंदर
हरवून गेलो त्यांच्यात आम्ही
दिला थोडा वेळ आणि कमावला
आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल अनुभव....
पालक आणि शिक्षक त्यांचे
आहेत खरच खुप चांगले...
अपेक्षा ठेवून मुलांकडे अजुनही
घेतात सुखद आनंद सगळे ....
आदिती च हसण , श्रेयाच लाजण...
प्रशांत च प्रयत्न करून बोलन आणि
हेमंत च बेधड़क वागण....
ते तीन तास कसे गेले
कुठे गेले कोणालाही समजल नाही
पण कोणासोबत गेले हे सगळ्याना
आयुष्य संपेपर्यंत लक्षात राहिल........
धन्यवाद
भंडारी मंडळ
-रुणाली शिरधनकर
जेव्हा आपण शाळेत गेलो आणि शिक्षक एक एका मुलांना घेवून येत होते तेव्हा थोडा वेळ मी shock होतो... पण नंतर जाणवले या मुलांमध्ये एक वेगळाच स्पार्क आहे जरी त्यांच्या मध्ये काही अपंगत्व असले तरी हि त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे.
उत्तर द्याहटवाप्रशांत सारखा मुलगा जो बोलू शकत नाही, चालू शकत नाही तरी हि तो गाण्यांच्या CD मधले तुम्हाला हवे असलेले गाणे तो गाण्यांची लिस्ट न बघता लावू शकतो हे जेव्हा बघितले तेव्हा खरच मला शाळेतल्या शिक्षकांचा अभिमान वाटला. आनंदी स्पेशल स्कूलच्या सगळ्या शिक्षकांचे मी आभार मानतो कि त्यांनी या मुलांना भावना व्यक्त करायला नवीन मार्ग दिला.
आनंदी ... शाळा नाही ते कॅनवास आहे निरागस मुलांच्या मनातील चित्र रेखाटण्यासाठी ...