नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकरसंक्रातीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा तसेच हे नवीन वर्ष भंडारी मंडळ परिवाराला सुख आणि समृद्धीचे जावो.!!

४था वर्धापन दिन

आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी प्रत्येक प्राप्तीचा महोत्सव साजरा करताना हवी असतात "आपली माणसं". दिनांक १५ एप्रिल २०१० रोजी आपल्या लाडक्या भंडारी मंडळाला ४ वर्षं पूर्ण झाली त्यानिमित्त रविवार, दिनांक २ मे २०१० रोजी सायंकाळी ५.०० वाजता दादर येथील परुळेकर सभागृहात भंडारी मंडळाचा ४था वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला एकूण ६० सभासदांनी आपली उपस्थिती लावली.
वर्धापन दिनाची सुरुवात हि भंडारी मंडळाच्या सदस्यांच्या आगमनाने झाली. नंतर सभागृहात फुगे आणि रिबीन लावून थोडी फार सजावट करण्यात आली. त्यानंतर एकमेकांच्या ओळखी वाढवत, गंमती-जमतीने, छायाचित्रांच्या वर्षावाने, थोडी मस्करी, थोडी मज्जा, मग थोडेसे खेळ आणि मग पाच्छात्य संस्कृतीप्रमाणे एक गंमत म्हणून केक कापून झाली आणि त्यानंतर सुरु झाला डिजे जल्लोष आणि कल्लोष. प्रत्येक जण डिजे च्या तालावर थिरकत होता आणि सोबत अल्पोपहाराचा आस्वाद घेत नाचत गात होता.


भंडारी मंडळाला आजपर्यंत यशस्वी वाटचाल करता आली ती फक्त हा सगळा एकत्रपणा, स्नेहभावना, आपलेपणा आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच. गेल्या ४ वर्षात भंडारी मंडळा मार्फत जे काही चांगलं झालं असेल, तर त्या मागे फक्त भंडारी मंडळाच्या हजर असलेल्या प्रत्येक सभासदाचा सिंहाचा वाटा आहे.
या पुढेही भंडारी मंडळाला आपल्या शुभेछ्यांची आणि स्नेहाशीर्वादांची गरज आहे आणि ते तसेच अखंड राहो एवढीच श्री चरणी प्रार्थना..!
अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि गणपतीबाप्पांची तुम्हा-आम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...!




!!जय भंडारी!!





1 टिप्पणी: