नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकरसंक्रातीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा तसेच हे नवीन वर्ष भंडारी मंडळ परिवाराला सुख आणि समृद्धीचे जावो.!!

* रक्तदान शिबीर

कार्यक्रम : रक्तदान शिबिर
दिनांक : २९.०६.२००८ रोजी ,
“थिंक फाउंडेशन" च्या मदतीने
दादर सेन्ट्रल रेल्वे स्टेशनवरील तिकीट घराजवळ,
सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आला होता.
 "महाराष्ट्र टाइम्स" या व्रुत्तपत्राने हि आपल्या रक्तदान शिबीर या कार्यकमाची दखल घेतली होती. म. टा. च्या दिनांक २६.०६.२००८ रोजी पान नं. ३ वर "थोडक्यात" या सदरात याबद्दल बातमी छापुन आली होती.
भंडारी मंडळातील एकूण ३० सभासदांनी त्या दिवशी आपले रक्त दान केले. तसेच सर्व सभासदांनी विनंती करून दादर स्टेशनवरील काही प्रवाश्यांना हि रक्तदान करण्यास प्रवूत्त केले. त्यात विशेष आभार मानावे ते आपल्या "स्मिता नारोजी / प्रेरणा प्रसाद कांबळी" चे. आपल्या सभासदांच्या आग्रहावरून काही प्रवाशी रक्तदान करण्यास तयार झाले आणि अश्याप्रकारे त्या दिवशी रक्तदान करणारयानचा आकडा बघता बघता १०२ पर्यंत गेला.
तसेच भंडारी मंडळातील ३० सभासदांची थालेसेलेमियाची मोफत टेस्ट हि करण्यात आली.

थालेसेमिया (Thalassaemia) या आजाराबद्दल थोडी माहिती :
थालेसेमिया या आजाराचे मुख्यत दोन प्रकार आहेत.
1. थालेसेमिया माईनर (Thalassaemia Minor) :
थालेसेमिया माईनर असलेली व्यक्ती हि निरोगी आयुष्य जगत असते. ह्या आजाराचा त्यांना कसलाच त्रास होत नाही. जर पती पत्नी मधील फक्त कोणा एकाला थालेसेमिया माईनर असेल तर होणाऱ्या बाळाला हा आजार होत नाही पण जर पती आणि पत्नी दोन्ही (Thalassaemia) थालेसेमिया माईनर असेल तर त्यांना होणारे मुल हे थालेसेमिया मेजर असते.
2. थालेसेमिया मेजर (Thalassaemia Major) :
थालेसेमिया मेजर या आजारामध्ये रक्तातल्या लाल पेशीमध्ये असलेल्या दोषामुळे त्या पेशी कमी होतात आणि अश्या मुलांना आठव्या महिन्यापासून अगदी शेवट मृत्यूपर्यंत दर महिन्याला “ब्लड ट्रान्सफ्युझन” (शरीरातील संपूर्ण रक्त बदल) घ्यावं लागतं. ज्यात शरीरातील जुने रक्त पूर्णपणे काढून टाकून रोग्याला नवीन रक्त दिले जाते. हि प्रकिया खूपच खर्चिक असते.
थालेसेमिया माईनर आपल्याला आहे की नाही हे तरूण वयात या आजाराबद्दल कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने रक्ताची चाचणी (ब्लड टेस्ट) केल्याशिवाय कळत नाही. म्हणूनच लग्न जुळवण्याआधी तरुणांनी (स्त्री आणि पुरुष) आपली थालेसेमिया चाचणी जरूर करून घ्यावी. जेणेकरून त्यांचे होणारे बाळ सुधृढ असेल आणि त्यांचे भावी आयुष्य सुखी जाईल.
रक्तदानासंबंधी माहीती :
रक्तगट (ब्लडग्रुप) म्हणजे काय?
जर सर्वच माणसांचे रक्त लाल असते तर त्यात फरक का असतो? तर हा फरक असतो रक्ताच्या गुणधर्मातील फरकामुळे. रक्ताची चार भागात विभागणी केली आहे. आपले रक्त प्रमुख्याने प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढर्‍या पेशी व लाल पेशी या घटकांनी मिळून बनलेले आहे. त्याच प्रमाणे रक्तात एक प्रकारचे प्रोटीन (ऍण्टीजन) ही असतात. या ऍण्टीजनच्या भिन्नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्तानाच रक्तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए, एबी, बी, आणि ओ असे चार प्रमुख गट असून आर एच पॉझिटिव्ह व आर एच निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्तगट. रक्तातील आर एच हे सुध्दा एक प्रोटीनच, ज्यांच्या रक्तात ते असते त्यांना आर एच पॉझिटिव्ह व नसणार्‍यांना आर एच निगेटिव्ह म्हणतात. रक्तगट अनुवंशिक नसतात. त्यामूळे भावा- बहिणींचे रक्तगट एकच असेल असे नाही.
“ओ’ रक्तगटाचे रक्त इतर सर्व गटांना चालू शकते म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तीना “युनिव्हर्सल डोनर’ असे म्हणतात. जगामध्ये “ओ’ रक्तगटाचे वर्चस्व असून या रक्तगटाची एकूण टक्‍केवारी ४६ टक्के आढळून येते. निगेटिव्ह रक्तगट दुर्मिळ असतात, त्यात एबी निगेटिव्ह रक्तगट तर पाच हजार व्यक्तींमध्ये एकाचा असतो. रक्त चढविण्याआधी रुग्णाचा रक्तगट आणि रक्तदात्याचा रक्तगट यांचे क्रॉसमॅच होणे जरुरी असते.
रक्तादानासाठी आवश्यक पात्रता:
रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.
* १८ ते ६० वयोगटातील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते.
* वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे.
* हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.
* रक्तदात्याने आधी किमान तीन महिने रक्तदान केलेले नसावे.
* उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.
पुढीलपैकी कोणत्याही पर्यायास पात्र ठरणारी व्यक्ति रक्तदानास पात्र ठरू शकत नाही.

* मलेरिया (एक वर्षाच्या आत)
* हेपेटायटीस बी, सी,
* कोणत्याही प्रकारची कावीळ (मागील १६ वर्षात)
* एड्स
* क्षयरोग
* मधुमेह (सध्या औषधे चालू आहेत का?)
* फिट्स / लखवा
* कर्करोग,
* महारोग किंवा इतर संसर्ग जन्य रोग
* कोणत्याही प्रकारची एलेर्जी
* हेमोफिलिया
* किडनी प्रोब्लेम्स
* हृदयरोग
* कांजन्या (एक वर्ष)
* होर्मोनल आजार
* हिमोग्लोबिंची कमतरता / अनेमिया
* अशक्तपणा
* देवी
* रक्त बदलने (गेल्या ६ महिन्यात)
* मोठी शस्त्रक्रिया (गेल्या ३ महिन्यात)
* बाळंतपण (गेल्या ६ महिन्यात)
* इंद्रिय शस्त्रक्रिया (गेल्या वर्षभरात)

रक्तदान कसे केले जाते?
रक्तदान हे साध्या व सोप्प्या पद्धतीने केले जाते. रक्तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्तदात्यास रक्तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.
रक्तदात्याच्या रक्तावर व्ही. डी. आर. एच. आय. व्ही. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया इत्यादी चाचण्या केल्या जातात. या सर्व चाचणी द्वारा योग्य ठरवलेले रक्तच रुग्णासाठी वापरले जाते.
निरोगी रक्तदात्याचे समगटाचे रक्त व रुग्णाचे रक्त यांच्यामध्ये क्रॉस मॅचिंगच्या चाचण्या केल्या जातात. मेजर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्तदात्याच्या लालपेशी रुग्णाच्या प्लाझ्मा (रक्तातील द्रव) बरोबर, तर मायनर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्‍तदात्याचा प्लाझ्मा रुग्णाच्या लालपेशींबरोबर मिसळला जातो. क्रॉसमॅचिंगमधील दोन्ही नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात.
सुदृढ मनुष्याच्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्त वहात असते. रक्तदानाच्या वेळी त्यातील ३५० मि. ली. एवढेच रक्त घेतले जाते. ६० किलो पेक्षा जास्त वजन असणारया व्यक्ती ४५० मिली रक्तदान करू शकतात.
पुढील ४८ तासात संपूर्ण रक्त व रक्तघटक पूर्ववत भरपाई शरीरात होते. रक्तदानानंतर ताबडतोब नेहमीचे कामकाज करु शकतो. त्यामुळे रक्तदानाविषयी कोणताही भयगंड न बाळगता प्रत्येक निरोगी व्यकक्तीने निरपेक्ष रक्तदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.
निरोगी रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करु शकतो. मात्र एका व्यक्तीने १०० वेळा रक्तदान करण्यापेक्षा १०० व्यक्तींनी दरवर्षी एकदा रक्तदान केले तर जास्त उपयुक्त ठरते. कारण या १०० व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात (त्यांनी २५ ते ४० वेळा रक्तदान केले तर) २५०० ते ४००० बाटल्या रक्त देऊ शकतील. वाढदिवसाला रक्तदान करायला हवे हा संदेश समाजात रुजला तर आपल्या देशात कधीही रक्ताची चणचण भासणार नाही.
रक्तदान हेच खरे जीवनदान :
* अपघातात किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त व्यक्तीस रक्त बदलावे लागते.
* लहान मोठ्या शस्त्र क्रियांसाठी रक्ताची गरज लागते.
* जळलेल्या व्यक्तीना रक्त साहाय्य,
* अनेमिया रुग्णांना रक्त सहाय्य,
* प्रसूती दरम्यान बाळाच्या आईस रक्त सहाय्य,
* नुकत्याच जमलेल्या बाळाच्या शस्त्र क्रियेसाठी रक्त सहाय्य,
* वैद्यकीय शस्त्रक्रिये दरम्यान रक्तातील आवश्यक घटकांचे सहाय्य,
* थेलेसिमिआ, हेमोफिलिया, लुकेलीआ, रक्ताचा कर्करोग हया आजारांनी ग्रस्त मुलांना रक्त सहाय्य
रक्तदानामुळे होणारे फायदे :
* रक्तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. रक्त प्राप्त करणार्‍या व्यक्तीलाच त्याचा लाभ होतो असे नाही तर रक्तदान करणार्‍यालाही अनेक बाबतीत फायदा होतो. रक्तदानामुळे तुमच्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते.
* रक्तदानामुळे तुम्हाला तुमचा रक्तगट कळू शकतो. कारण रक्तदानाचे कार्ड दिले जाते. त्यावर हा रक्तगट लिहिलेला असतो.
* रक्तदानामुळे मनुष्याचे हृदय आरोग्यपूर्ण बनते. कारण शरीरातील अतिरिक्त लवण (मीठ) रक्तदानाद्वारे निघून जाते.
* रक्तदान करणार्‍यांना जे रक्तदाता कार्ड मिळते त्यामुळे तुम्हाला कधीही आपत्कालीन गरज पडल्यास रक्त मिळु शकते.
काही रक्तदान पेढयांची माहिती आपल्याला खालील लिंक वर पाहता येईल :

http://www.thinkfoundation.org/index.htm

http://www.thinkfoundation.org/Day%20Care%20Centres%20Mumbai_R.htm

http://www.prabodhan.org/bloodbank/index_marathi.html

http://www.karmayog.org/bloodbanks/bloodbanks_9123.htm

२ टिप्पण्या:

  1. अफलातून अनुभव....
    ज्याप्रमाणे स्नेह्सम्मेलानाची रुखरुख होती मनाला तशीच रक्तदान शिबिराचिही...
    खरे तर वाटलेले की आपली कम्युनिटी चांगला प्रतिसाद देईल...
    पण म्हणावे तितका आपला प्रतिसाद मिळाला नाही...

    पण आम्ही भंडारी कधीच हरणार नाही..
    आणी नाही कशाची खंत बालगनार ....
    शेवटच्या क्षणापर्यंत लढनार....
    आणी लढलो ही.....
    आपल्या ऑरकुट कम्युनिटीचे ३० मेम्बर्स...
    आणी आपल्या संयोजकन्न्च्या प्रयात्न्नान्नी आपण १०२ डोनर्स ची मजाल गाठली...
    आणी रक्तदान शिबिर यशस्वी केले....

    अनुभव....

    कालच्या रक्तदान शिबिराने मार्केटिंगचा चांगलाच अनुभव मिळाला...
    लोकांच्या विविध स्वभावाचा ही चांगलाच अनुभव आला...
    काही लोक स्वताहून रक्तदानासाठी आलेत..
    तर काही लोक आपल्या संयोजकांच्या विनवनिने आलेत... यात स्मिताने तर मजलच गाठली..
    काही लोक रक्त आणी सुई च्या नावानेच घाबरले....
    काही लोकांचे ऍक्स्प्रॅशन म्हणजे " काय काम-धंदे नाहीत का तुम्हाला????" असे होते....
    लोकल पकडनारया लोकांची धावपळ... आणी आमच्यामुले झालेली त्यांची तारम्बल.....
    पण आमचे एक ना एय्कता... फाट्यावर मारून पलनारी मंडळी... काल आम्हाला भेटली..

    एक विशेष व्यक्ति:
    रक्तदान शिबिर वेळ सकाळी १० ते सायं.६ वाजेपर्यंत...
    एक बाई...
    ६ वाजल्यानंतर आली...
    तिला रक्तदान करायचे होते...
    तिची नोकरी उशिरा सुटल्याने तिला वेळेत येता आले नाही...
    पण तिला काही करूँ रक्त द्यायाचेच होते...
    बिचारीने डॉकतोरंकडे खुप विनंती केलि..
    तिची टलमल पाहून खरच खुप अजब वाटले..

    असा आणी बरेच वेगवेगले अनुभव मिलूं शिबिर यशस्वी केले आम्ही...
    आणी येस..
    as sachin said...... "hat's off to smita"... wonderfull work..dear...

    उत्तर द्याहटवा
  2. वजन कमी असल्यामुळे मला रक्तदान नाही करता आले त्याचे वाईट वाटत होते :( ................ पण आपला कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला त्याचे समाधान आहे ............ आपल्या सर्वांची थालेसेमियाची टेस्ट तरी झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने ............ Smita Naroji Rock our Blood Donation Camp .......... :)

    उत्तर द्याहटवा