स्नेहसंमेलनाची कल्पना ही नुसती कल्पनाच न ठेवता तिला वास्तवात आणायचा प्रयत्न चालू झाला. स्नेह-संमेलन करायचे म्हणजे सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज होती. सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणांची गरज होती. अखेर भेटण्यासाठी जागा ठरली... दादरच्या रुईया महाविद्यालायासमोरील कट्टा. दर रविवारी सगळे एकत्र येऊ लागले. स्नेह-संमेलन करायचे यावर शिक्कामोर्तब झाला. कार्यक्रमाची आखणी, रूपरेषा आणि त्यासाठी लागणारे अर्थसहाय्य याबाबतीत विचार विनिमय सुरु झाले. कार्यक्रमासाठी जागा भाड्याने घेणे, कॅटरस , डी.जे. आणि इतर काही खर्चही बजेटमध्ये घेतले गेले. काही मित्रांनी या कार्यक्रमासाठी स्पॉनसरची कल्पना तर काहींनी राजकीय सहभाग ही सुचवला. स्पॉनसर किंवा राजकीय व्यक्तीच्या मदतीने काम करणे म्हणजे पुढे त्यांचाच एक घटक बनणे, याचा अर्थ आपले विचार स्वातंत्र्य हिरावून जाण्याची शक्यता सर्वांना जाणवू लागली आणि राजकीय बाहुली बनण्यापेक्षा स्व:बळावर, एकमेकांच्या मदतीने आपण हा कार्यक्रम साध्य करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला अन तारीख ठरली २१ जानेवारी २००७.
ओर्कुट्चे जाळे सगळीकडे पसरले गेले होते पण त्याची व्याप्ती मात्र झाली नव्हती. कम्युनिटी रजिस्टर होऊन फक्त आठ महिने झाले होते आणि देश-विदेशातून ५०० जणांनी आपल्या कम्युनिटीची सदस्यता घेतली होती, अखेर तो दिवस उजाडला.... तेव्हा एकूण ६० जणांनी आपल्या या स्नेहसंमेलनाला उपस्थिती दाखविली होती. सगळे जमू लागलो तशी उत्कंटा वाढू लागली. एक नवीन अध्याय जोडला जाणार होता. सुरुवात होणार होती भंडारी मंडळाच्या वाटचालीची. प्रविण शिरवाडकर, प्रज्ञा म्हाळसेकर यांनी भंडारयांचा इतिहास सांगितला तर सचिन चाफेरकर याने सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना अडीअडचणीला मदत करणे हा आजच्या कार्यक्रमाचा हेतू सर्वांसमोर मांडला.
थोडी फार सगळ्यांची ओळख आतापर्यंत झाली होती, काही अनोळखी होते त्यांना ओळखीसाठी एक नाव पुरेसे होते "भंडारी". डी.जे. चा ताल धरू लागला. आपल्या पोत्यातून एक एक गेम्स काढू लागला. संगीत खुर्ची, काही स्पॉट गिफ्ट्स, मुला-मुलींचे रैम्प वॉक असे एका पेक्षा एक खेळ होऊ लागले. सारे वातावरण बदलू लागले, रंग जमू लागला. अमित पडवळ, श्रेयस पाटकर यांच्या गाण्यांनी मेहफिल सजली तर सागर पाटीलने उत्तम मिमिक्रीचा नमुना पेश केला. आम्ही केलेल्या विचारांपलीकडे हा कार्यक्रम आपला ठसा उमटवत होता.कधी घडाळ्याचे काटे पुढे सरकले समजलेच नाही, ते चार तास सगळयांसाठी मंत्रमुग्ध करणारे होते. पुन्हा सगळ्यांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी भंडारी मंडळात भेटत राहण्याची इच्छा मनात बाळगून एकमेकांचा निरोप घेतला.
* दुसरे स्नेहसंमेलन : नवे सामाजिक पर्व
* ३ रें स्नेह संमेलन
I enjoy DJ, Catwalk and Sagar Patil's mimicry very much :) ........
उत्तर द्याहटवा