रक्तदान शिबिरानंतर भंडारी मंडळाने पुढचे सामाजिक कार्य केले ते म्हणजे संजय गांधी राष्ट्रिय उद्यान (नॅशनल पार्क) - बोरीवली मध्ये वृक्षरोपण.
नॅशनल पार्क मधील ग्राउंड ऑफिसर श्री. भारती ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे
१. नॅशनल पार्क वृक्षरोपनासाठी जागा उपलब्ध करून देते.
२. त्यासाठी रजिस्टर्ड क्लब हवाच असे नाही.
३. वृक्षरोपणाची माहिती देण्यासाठी त्यांच्या तर्फे सहकारी दिला जाईल.
४. या कामासाठी कोणत्याही प्रकारे पैसे आकारले जाणार नाहीत.
५. वृक्षरोपण हे एका दिवसात होऊ शकत नाही. उन्हाळा चालू असल्यामुळे आता झाडे लावण्यासाठी खडडे करावे, त्यामुळे मातीतील बुरशीचा नाश होईल असे त्यांचे मत होते.
६. पाउस सुरु झाला की झाड लावणे योग्य.
७. लिखित अनुमतीसाठी एक अनुमति पत्र प्रथम द्यावे लागते. या पत्रामधे आपल्या कम्युनिटीच्या माहिती बरोबरच झाडे किती लावणार? कोणती लावणार? सर्वसाधारण किती व्यक्ति सहभागी होणार? आपल्याला उद्यानाकडून कोणती मदत अपेक्षित आहे? नमूद करणे आवश्यक आहे.
८. नेशनल पार्क नर्सरीमधे फक्त शोभेची झाडे आहेत. त्यामुळे बाहेरून झाडे विकत आणावीत.
९. झाडाच्या देखभालीसाठी मंडळाचे सदस्य वरचे वर भेट देऊ शकतात.
त्यामुळे आमचा वृक्षरोपण हा कार्यक्रम दोन टप्प्यात पार पाडण्याचे ठरले. त्यासाठी नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांकडून ह्या कामासाठी लिखित अनुमती पत्र हि आम्ही आधीच घेवून ठेवले. ठरल्याप्रमाणे दिनांक ३१ मे २००९ रोजी नॅशनल पार्क मध्ये जावून झाडांसाठी खड्डे खणण्यात आले आणि दिनांक २८ जून २००९ रोजी झाडे लावण्यात आली त्याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे. नॅशनल पार्क च्या गेट वर सकाळी ९ च्या आसपास भंडारी मंडळाचे ३० सभासद जमा झाले. वृक्षरोपणाचे आमचे ठिकाण लांब असल्यामुळे काही सभासदांच्या बाईक वरून, काही पायी असा आमचा प्रवास सुरु झाला. जागेवर पोचल्यावर सगळ्यांनी आधी सकाळची न्याहारी करून घेतली. कामाला सुरुवात करण्याआधी गाऱ्हाणे घालून मग नारळ फोडण्यात आला आणि अश्याप्रकारे झाडांसाठी खडडे खणण्याच्या आमच्या कामाला सुरुवात झाली. ३० सभासदांची ५ विभागात गटवारी करण्यात आली. त्यानंतर किती खडडे खोदावे, कसे, कुठल्या मापाचे हा विचार करण्यात आला. जवळ जवळ २० खडडे खोदल्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणासाठी थोडी विश्रांती घेतली आणि मग पुन्हा कामाला सुरुवात केली. कडक उन्हाने तापलेली जमीन आणि त्यात जास्त दगडी असल्यामुळे खडडे खणताना आमची खूपच दमछाक झाली. पण तरीही आमचा कामाचा उत्साह उदंड होता. बघता बघता आम्ही सर्वानी मिळून त्यादिवशी एकूण २५ खडडे खोदले.
२. दिनांक २८ जून २००९ रोजी झाडे लावणे :
भंडारी मंडळाच्या काही सदस्यांनी नर्सरीतून २५ झाडे आणि काही प्रमाणात खत आदल्या दिवशीच नॅशनल पार्क मध्ये आणून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे सगळी मंडळी जमा झाली आणि आमचा प्रवास सुरु झाला आमच्या वृक्षरोपणाच्या ठिकाणी. आधी न्याहारी करून मग आमची कामाला सुरुवात झाली. खडडे आधीच खणून तयार असल्यामुळे सर्वानी ग्रुप बनवून पटापट झाडे लावण्याचे काम केले. सर्व झाडे लावून झाल्यावर आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून बहुतेक पावसाने हि नेमकी त्या दिवशी हजेरी लावली आणि आम्ही लावलेल्या झाडांना पाणी देण्याचे काम केले. निसर्ग त्यादिवशी आमच्यावर खूपच खुष होता बहुतेक. आम्ही सर्वजन नॅशनल पार्क च्या गेट वर परतत असताना हरीणांचा कळप नजरेस पडला आणि आमच्या सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
वृक्षरोपणाचे फायदे :
निसर्ग बदलत नसतो, बदलते ती माणसाची जीवनशैली. पुढील काही वर्षांतच आपल्याला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत व त्याची नांदी सुरू झाली आहे; कारण गेल्या वर्षी महाराष्ट्रात पडलेली कडाक्याची थंडी, या मार्च महिन्यातील बिगर मोसमी पाऊस वगैरे. यासाठी आपल्या साध्या सवयीनेही बदल घडू शकतो. आपल्याच वाढदिवसाला एक झाड लावणे व त्याचे संवर्धन करणे. त्याचे फायदेही मिळतील. जमिनीची धूप थांबेल. पक्ष्यांना निवारा मिळेल व फळा-फुलांनी बहरलेले झाड बघण्याचा आनंद मिळेल आणि आपण नकळत सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान हि मिळेल.
तर मंडळी तुम्ही हि एक तरी झाड लावाल ना?



नमस्कार मंडळी...
उत्तर द्याहटवाहें सर्व वाचून मी पुन्हा _ गेली
"आव बाई पगार द्या कि व!!!!" आठवले का तुम्हाला मी कामगार बाई झालेली.... आणि पगार नव्हता मिळत म्हणून संपावर गेलेले....
पण मी काही जास्त वेळ संप करून शकले नाही ........
मला ही तुमच्याशी वृक्षारोपणाचा अनुभव शेअर करायचाय...
काय मग?? काय धम्माल केलीय ना आपण...????
मी जरी दुपारी तुमच्यात सहभागी झाले असले तरी... उशिरा आलेल्यान्ना म्हणुन सांगते... की मी लवकर येउन उपस्थिति लाउन गेलेले... मला माहित आहे... प्रणेताकडून चोक्लेट घ्यायचे होते ते... बरोबर ना सचिन.... वेळेवर उपस्थित असलेल्यांना आपण नेहमीच कौतुक करतो... त्यामुले वैशाली... सागर... अक्षय... तुमचे मला कौतुक करावेसे वाटते... वेळेवर हजार होतात म्हणून....
बाकी सर्व मंडळी आपल्या बी. ऍम. स्टैंडर्ड टाइम वर आली... त्यांचे खास कौतुक...
विवेक गाडीस्वार यांचे ही विशेष आभार.... सोबत मोटरसायकलस्वार प्रसन्ना भाटकर, निमिष तांडेल, प्रसाद कांबळी, डेलिवरीबॉय प्रीतेश पेडणेकर, रवि अम्बेरकर, सतीश राजिवडेकर ... यांचे आभार मानायचे कसे विसरावे.... तर ८.३० चा वेळ दिल्यावर बी ऍम स्टैण्डर्ड वेळेवर म्हणजे ९.३० पर्यंत सर्व जण पोहोचले...
सर्वांची हजेरी घेउन...मी जड़ पाउलाननी परीक्षेला निघून गेले...
बरोबर १ वाजता माझा पेपर संपला....
साधारण २ वाजता मी गेट वर पोहचले...
तिथे मला प्रसाद घ्यायला आला...
त्यानंतर आम्ही स्पॉट वर पोहोचलो...
स्पॉटवर पोहचल्यावर मंडळी फार थकल्याचे दिसत होते.. एकूण १५ खड्डे खणून बिचाऱ्यांचे तरण मेटाकुटीला आलेले.... आणि सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होते....
गेल्यावर लगेच आम्हाला दुसरया पाळीतील लोक म्हणुन जबाबदारी दिली... ५ खड्डे खणायची ...
त्यानंतर लगेच जेवण आले... खरच विराज आणी चित्राच्या आईला धन्यवाद्... जेवण अगदी अप्रतिम होते....
पण जेवण वाढताना बिचारया स्वाती आणि मुग्धाची हालत झाली... सर्वांना वाढता वाढता त्यांनाच बिचार्यन्ना जेवायला मिळत नव्हते...
आणि आमची मंडळी तर जेवून टूण झाली होती...
म्हणुन आम्ही जमिनीवर पसरवलेले पेपर पटकन गोळा केले.. का???
मंडळी झोपली असती तर उठायचे नाव घेतले असते का....
लगेच कामाला लावले त्यांना.. अर्ध्यान्ना पानी आणायला पाठवले...
थोडा अर्धा तासाचा ब्रेक घेतल्यावर आम्ही मंडळी कामाला लागलो...
उन्हात तापत असलेया हत्यारान्ना हातात घेउन आम्ही सुरुवात केली... (काळजी करू नका... हातात रुमाल घेतलेला आम्ही...)
शिवाय आपल्या अनुभवी प्रीतेश साहेबांचे म्हणने होते की "गरम हत्यारान्मुले माती लवकर खणली जाते... दगड वितळतात म्हणे.." ;)
अहो मी जो खड्डा खणायला घेतला तो पूर्ण होईपर्यंत अतुल आणी इतर मंडळीनी ३ खड्डे खणले...
दगडच होते मोठे मोठे.... अक्षय आला मदतीला म्हणुन... शिवाय... पिंकी पण आली मदतीला...
नाहीतर माझी तर हवाच गुल होती... शेवटी प्रीतेश महाराजांच्या आशिर्वादाने... तो खड्डा खणला आम्ही...थैंक्स टू स्वाती... तिने जर हातात छड़ी घेतली नसती तर प्रीतेश साहेबानच्या त्या आशिर्वादापासून आम्ही वंचित राहिलो असतो...
शेवटच्या खड्डा खणणयi समयी... विकास आणी मनोजने हातात शस्त्र घेतले.... आणी आम्ही करवंटी .... उगाच गेरसमज करून घेऊ नका.... मला म्हणायचे होते... की आम्ही माती काढायला हातात करवंटी घेतली...
आणी शेवटचा खड्डा खणून मोहिम फत्ते केली...
मैडम कड़े पगार मागितला...
पण आमच्या मैडम ने आमच्या पोटावर पानी सोडले हो....
आओ मैडम पगार द्या किहो...
वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठरला त्यावेळी वाटले नव्हते की खडडे खणणे इतके कठीण काम असेल ........... बापरे काय जमीन होती ती .............. नुसत्या दगडी आणि त्यात उन्हामुळे तापलेली असल्याने आणखीनच कडक झाली होती ........... वरून सूर्य नुसता आग ओकत होता .............. बिचाऱ्या मुलांची खडडे खणताना जाम हालत झाली ......... आम्ही मुलींनी फक्त खड्ड्यातील माती काढण्याचे काम केले :P (श्वेता आणि रुणाली सोडून ..... दोघींनीही स्वत:च कोणाच्याही मदतीशिवाय एक एक खड्डा खणला ......... काय पॉवर आहे दोघींत) ................
उत्तर द्याहटवावृक्षरोपणाचा दुसरा भाग म्हणजेच झाडे लावणे मी जास्त एन्जॉय केला ........... पावसात मस्त भिजायची इच्छा पूर्ण झाली आणि हरीणांचा कळप बघून तर अहाहा काय सुंदर दृश्य होते ते ... अवर्णनीय! ........... त्यात अतुलच्या फोटोसेशनमुळे आणखी मजा आली ....... एकूण मस्त अनुभव होता ........... काही तरी चांगलं काम केल्याचं समाधान पूर्ण ग्रुपच्या चेहऱ्यावर होतं .......... :)